टीस्पून की टेबलस्पून? रेसिपीतील हे मोजमाप समजून घ्या एकदाच!

Mayuri Gawade

अनेक रेसिपींमध्ये 'टीस्पून' आणि 'टेबलस्पून' ही मोजमापं पाहून गोंधळ होतो. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
या दोन्ही मोजमापांमधील फरक समजून घेतल्यास पदार्थाचं प्रमाण आणि चव दोन्ही अचूक राहतात.
टीस्पून (Tsp) म्हणजे छोटा चमचा, तर टेबलस्पून (Tbsp) म्हणजे मोठा चमचा.
एक टेबलस्पून हे तीन टीस्पूनच्या प्रमाणाएवढं असतं.
मोजमापानुसार एक टेबलस्पून म्हणजे सुमारे १५ मिलीलीटर, आणि एक टीस्पून म्हणजे ५ मिलीलीटर.
द्रव पदार्थ जसे दूध, तेल, पाणी मोजण्यासाठी प्रामुख्याने टेबलस्पून वापरला जातो.
तर मीठ, मसाला, साखर यांसारख्या कोरड्या घटकांसाठी टीस्पूनचा वापर केला जातो.
लक्षात ठेवा, 'T' म्हणजे टेबलस्पून (मोठा चमचा) आणि 't' म्हणजे टीस्पून (छोटा चमचा)!