Teddy Day 2024 : टेडी बिअर देताना 'या' गोष्टी जाणून घ्या!

Swapnil S

सध्या जगभरात प्रेमाचा उत्सव सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. कारण, सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या वीकची सुरूवात रोझ डे ने झाली. त्यानंतर प्रपोझ डे, चॉकलेट डे आणि आज टेडी डे सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी देऊन हा 'टेडी डे' साजरा केला जातो. | PM
लाल रंगाचे टेडी बिअर लाल रंगाच्या टेडी बिअरला प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही लाल रंगाचा टेडी बिअर किंवा लाल रंगाचे हर्ट(हृदय) पकडलेला लाल टेडी बिअर कुणाला गिफ्ट केला, तर याचा अर्थ असा होतो की, तुमचे त्या व्यक्तीवर प्रेम आहे. जर या लाल रंगाच्या टेडी बिअरसोबत तुम्ही चॉकलेट जर गिफ्ट केले तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला त्या व्यक्तीसोबत कायमचे नाते जोडायचे आहे. | PM
गुलाबी रंगाचे टेडी बिअर जर तुम्ही कुणाला गुलाबी रंगाचे टेडी बिअर गिफ्ट करत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला त्या व्यक्तीसोबत मैत्री करायची आहे. तसेच, गिफ्ट देणारी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत असून ती व्यक्ती तुमच्याशी मैत्री करण्यासाठी उत्सुक आहे. मैत्रीचे प्रतिक म्हणून गुलाबी रंगाच्या टेडी बिअरला ओळखले जाते. | PM
निळ्या रंगाचे टेडी बिअर निळ्या रंगाच्या टेडी बिअरबद्दल बोलायचे झाल्यास निळा रंग हा बुद्धिमत्ता, सत्य, निष्ठा, स्थिरता आणि आत्मविश्वास यांचे प्रतिक मानले जाते. जर तुम्हाला या रंगाचा टेडी बिअर कुणी गिफ्ट केला तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही दोघे ही तुमच्या नात्यासाठी वचनबद्ध आहात. तसेच, तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्यासाठी तुम्ही नेहमी तयार आहात. | PM