अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झाली सरवणकरांची सून; लग्नानंतर नवदाम्पत्य पोहचलं सिद्धिविनायक मंदिरात! पाहा खास Photos
Mayuri Gawade
पूजा बिरारी आणि प्राजक्ता गायकवाडसोबतच अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही लग्नबंधनात अडकली.
| सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर)
दत्त जयंतीच्या मुहुर्तावर शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी तेजस्विनीने लग्नगाठ बांधली.
दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या या लग्न समारंभानंतर तेजस्विनी अधिकृतपणे सरवणकर कुटुंबाची सून झाली.
दरम्यान त्यांचे लग्नातील फोटो सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते तेजस्विनीच्या मंगळसूत्राने.
तेजस्विनीचे हे मंगळसूत्र जड मण्यांनी बनवलेले असून यात सोन्यांनी मढवलेल्या दोन मोठ्या वाट्या आहेत, जे सौभाग्य चिन्हाचे प्रतीक मानले जाते.
विवाहानंतर दोघांनीही त्यांच्या नव्या सहजीवनाची सुरुवात देवदर्शनाने केली.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर प्रभादेवी येथील प्रभादेवी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
या संपूर्ण प्रसंगाचे फोटो समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून सध्या ही फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
तेजस्विनीने मालिकांपासून सिनेमांपर्यंत तसेच बिग बॉस मराठीमध्येही काम करून नाव कमावले आहे.
तर समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदानंद सरवणकर यांचे पुत्र असून शिंदे गटाच्या राजकारणात सक्रिय आहेत.