'ठरलं तर मग!' फेम जुई गडकरीच्या फोटोशूटची चर्चा; निळ्या नऊवारीत खुललं सौंदर्य

किशोरी घायवट-उबाळे

'ठरलं तर मग!' फेम जुई गडकरीचा निळ्या नऊवारीतील हा पारंपरिक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
निळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये जुईचा मराठमोळा अंदाज खुलून दिसत आहे.
साडीला साजेशी आकर्षक, नक्षीदार ब्लाऊज डिझाइन तिच्या लूकला खास टच देत आहे.
नाकातील नथ, कानातले आणि गळ्यातील पारंपरिक दागिन्यांमुळे तिचा लूक अधिक खुलला आहे.
कपाळावर चंद्रकोर, हातभर बांगड्या, कंबरपट्टा, केसांचा अंबाडा आणि माळलेली फुलं यामुळे तिचा लूक अस्सल मराठमोळा दिसत आहे.
हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात पारंपरिक साडीला आधुनिक टच देत जुईने हातात आकर्षक डिझायनर बॅगही कॅरी केली आहे.
चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असलेला जुईचा हा नऊवारीतील मनमोहक अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळवत आहे.