अ‍ॅव्होकाडोचे फायदे घ्या जाणून!

Swapnil S

आठवड्यातून दोन वेळा अ‍ॅव्होकाडो खाल्ल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो.
अ‍ॅव्होकाडो मध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ब्लडप्रेशर कमी करणारे गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. अ‍ॅव्होकाडो मध्ये अनेक विटामिन आणि खनिजं असतात. जे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतात. | PM
अ‍ॅव्होकाडोमध्ये अशी तत्त्व आहेत जी शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतात. त्यामुळे याचं सेवन केल्यास मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना फारच लाभ होतो आणि शुगरही कंट्रोलमध्ये राहते. | PM
अ‍ॅव्होकाडो हे एक असं फळ आहे, ज्यामध्ये फॅटी अॅसिड खूप प्रमाणात आढळतात. पण यामध्ये कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी असते.
अ‍ॅव्होकाडो हृदय निरोगी ठेवण्यासही खूप उपयोगी आहे. अ‍ॅव्होकाडोमध्ये बीटा-सिटोस्टीरॉल आढळतं जे कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करून हृदयाला रोगांपासून दूर ठेवतं. एका रिसर्चनुसार, नियमितपणे अ‍ॅव्होकाडो खाल्ल्याने एचडीएल कॉलेस्ट्रॉलचे अँटीएथेरोजेनिक गुण वाढतात. जे हृदयाला एथेरोस्क्लेरोसिसपासून दूर ठेवतात. याच्या सेवनाने हॉर्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.