गाजर खाण्याचे फायदे माहिती आहेत का? एका गाजराचे अनेक फायदे, जाणून घ्या..

Swapnil S

गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं. रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं.
गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.
कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं | PM
दातांच्या तक्रारीवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. लहान मुलांना दात येताना गाजराचा रस दिल्यास फार त्रास होत नाही
गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचं आणि स्नायूचं आरोग्य सुधारतं. तसेच त्वचेचं आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं. | PM