जाणून घ्या नाचणीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे!

Swapnil S

नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज उत्तम आहार आहे.
चणे, हरभरा, उडीद, पोहे, शेंगदाणे, बटाटा हे पदार्थ शरीर बृंहण करण्याचं कार्य करतात. ते काम नाचणी करणार नाही. नाचणी पोटाला त्रास न देता जीवन रक्षणापुरतेच पिष्टमय पदार्थ शरीराला पुरवते.
नाचणीचा विशेष उपयोग आमांश, अजीर्ण, उदरवात, जुनाट ताप या पुन्हा पुन्हा त्रास देणाऱ्या रोगात होतो.
अनेकवेळा डॉक्टर लहान मुलांना नाचणी सत्व देण्यास सांगतात.
नाचणीमुळं वजन नियंत्रणात राहतं. | PM