'या' हंगामी भाज्यांमध्ये आहे पोषक तत्त्वांचा खजिना; जाणून घ्या सविस्तर

Swapnil S

कांद्याची पात :- व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, फॉस्फरस, फोलेट आणि पोटॅशियमने समृद्ध असलेली कांद्याची पात अतिशय पौष्टिक मानली जाते. निरोगी राहण्यासाठी तसेच पचनसंस्था नियंत्रित करण्यासाठी याचे अनेक फायदे आहेत.
गाजर :- व्हिटॅमिन ए समृद्ध गाजर डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे एक चांगले अँटी-ऑक्सिडेंट देखील आहे, ज्यामुळे ते वृद्धत्व विरोधी म्हणून काम करते. याशिवाय व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि फायबर देखील यामध्ये आढळतात. कोशिंबीर, पुलाव, हलवा यांसारखे पदार्थ गाजरापासून बनवले जातात.
कोबी :- या कमी-कॅलरी असलेल्या भाजीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. हे पाचन तंत्र मजबूत करते, हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते आणि संक्रमणांपासून संरक्षण करते.
फुलकोबी :- कार्टिनॉईड्स, जीवनसत्त्वे, फायबर, विद्राव्य साखर, फोलेट आणि पोटॅशियम आढळतात.
हिरवे वाटाणे:- हिरव्या वाटाण्यात हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे जसे की, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यामध्ये आढळतात. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात, हिरव्या वाटाण्यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. जसे की, पराठे, भाजी, पुलाव, सार, भजी इ.
तूप :- तूप हे एक सुपरफूड आहे. हाडांसाठी ते वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, जे हाडांना मजबूती देते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो.
बीट :- बीट हा नायट्रेटचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रक्त प्रवाह संतुलित राहतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे फोलेट, मँगनीज, फायबर, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ते सलाड म्हणून खा किंवा सूपमध्ये वापरा.