पुदिना खाण्याचे 'हे' आहेत फायदे!

Swapnil S

​यकृत निरोगी राहण्यासाठी आपल्याला होणारे बहुतेक आजार यकृताशी कोणत्या-न्-कोणत्या स्वरूपात जोडलेले असतात. कारण पचन प्रक्रियेमध्ये यकृताची महत्त्वपूर्ण भूमिका असते. तसंच शरीराला आवश्यक ती ऊर्जा देण्याची जबाबदारी सुद्धा या अवयवाची असते. यकृताची कार्य करण्याची गती मंदावल्यास तुमचीही काम करण्याची गती आपोआप कमी होते. म्हणजेच स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी तुमचे यकृत देखील सक्रिय असणे आवश्यक आहे. यासाठी नियमित पुदिन्याचे सेवन करावे. पुदिन्याची ४ ते ५ पाने तुम्ही चावून देखील खाऊ शकता.
फिट राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी हल्ली प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही काही जणांचे वजन नियंत्रणात राहत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये पुदिन्याच्या पानांचा समावेश करू शकता. पुदिन्याची चटणी, पुदिनायुक्त ताक, कोंशिबिरीमध्ये पुदिना मिक्स करून त्याचे सेवन करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत मिळेल. शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहील. | PM
श्वसनासंबंधीचे रोग पुदिन्यातील औषधी गुणधर्म दम्याच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे म्हटले जाते. धूळ, माती, अन्य गोष्टींपासून अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी पुदिन्याचा अर्क किंवा स्वयंपाकामध्ये पुदिन्याचा समावेश केल्यास त्यांना भरपूर फायदे मिळतील. | PM
स्मरणशक्ती वाढते पुदिन्यातील औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात. पुदिन्यामधील पोषक घटक मेंदूची आकलन शक्तीही वाढवण्यास मदत करतात. यामुळे आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत आपल्यामध्ये शारीरिक तसंच मानसिकरित्या सतर्कता वाढते. नियमित पुदिन्याचे सेवन करणारी लोक इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात.
​मुरुम कमी करण्यासाठी पुदिन्यामुळे तुम्हाला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. चेहऱ्यावरील मुरुम, त्यांचे डाग, चेहऱ्याचा काळपट कमी करायचा असेल तर पुदिन्याचा वापर करा. पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य खुलण्यास मदत मिळते. पिंपल, ब्लॅकहेड्स किंवा वाइटहेड्समुळे तुम्ही त्रस्त आहात तर पुदिन्याचा पानांचा लेप तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. | PM