उन्हाळ्यात कच्चे टोमॅटो खाण्याचे आरोग्याला होतात 'हे' फायदे
Kkhushi Niramish
उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हाळ्यात रसदार, गरं असलेली फळे किंवा फळभाजी आरोग्यासाठी उत्तम असतात. टोमॅटो हे उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारे फळ किंवा फळभाजी आहे. टोमॅटो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
कच्चे टोमॅटो खाणे हृदयासाठी चांगले असते. टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन हे वनस्पती संयुग हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.
उन्हाळ्यात शरीर सातत्याने डिहायड्रेट होत असते. कच्चे टोमॅटो खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
कच्चे टोमॅटो खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. तुम्ही टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावू शकता किंवा त्याचा फेसपॅक तयार करू शकता.
ओठ नैसिर्गिकपणे गुलाबी करण्यासाठी टोमॅटोचा उपयोग होतो. टोमॅटोचा रस नियमितपणे ओठांना लावल्याने ओठांचा काळपटपणा कमी होतो.