'हे' आहेत भरपूर पोषणमूल्य असणारे Superfruits; जाणून घ्या आरोग्यासाठी काय फायदे?

Kkhushi Niramish

सामान्यपणे ज्या फळांमध्ये अनेक पोषकतत्वे किंवा पोषणमूल्य असतात. जे एकाच वेळी वेगवेगळ्या आजारांमध्ये उत्तम आहार ठरतात त्यांना Superfruit म्हणतात. ब्लूबेरी हे एक Superfruit आहे. यामध्ये शरीराला आवश्यक पोषणमुल्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय रक्तदाबाच्या समस्येतही ब्लूबेरी खाल्ल्याने फायदे होतात.
पपई हे एक असे Superfruit आहे जे अनेक समस्यांमध्ये उपयुक्त ठरते. पपई केसांच्या विकारावर प्रभावी ठरतात. तसेच सौंदर्य समस्यांमध्ये पपयाचे फेसपॅक उपयुक्त ठरतात. पपईत जीवनसत्व ए मोठ्याप्रमाणात असते. महिलांना पीसीओडीच्या समस्यांमध्ये हे खूप फायदेशीर ठरते.
केळी या फळाला सर्वात पहिले Superfruit तसेच Superfood म्हणून दर्जा मिळाला. मुळात Superfood ची संकल्पनाच केळींमुळे अस्तित्वात आली. केळी पचनक्रियेशी संबंधित तक्रारी, वजन कमी करणे, अशक्तपणा दूर करणे, रक्ताची कमतरता दूर करणे, हिमोग्लोबीन वाढवणे अशा अनेक समस्यांमध्ये प्रभावी आहार ठरते.
डाळिंब हे Superfruit तर आहेच मात्र याला Fruit Of Heaven असेही म्हटले जाते. डाळिंबात जीवनसत्व क, के, आणि ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक (जस्त) मोठ्या प्रमाणात असते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्यांमध्ये डाळिंब अतिशय प्रभावी असते.
संत्र्यांमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. हे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे फळ आहे. वजन कमी करणे, दातांचे आजार, त्वचेचे विकार यामध्ये संत्री खाल्ल्याने मोठा आराम मिळतो.