मकरसंक्रांतीचा तिळगुळ, शरीरासाठी वरदान! जाणून घ्या फायदे
किशोरी घायवट-उबाळे
हिवाळ्यात शरीर उबदार राहते : तीळ आणि गूळ शरीरातील उष्णता वाढवतात. | (सर्व छायाचित्र: Yandex)
पचनशक्ती सुधारते : तिळगुळामुळे बद्धकोष्ठता व गॅसच्या तक्रारी कमी होतात.
हाडे मजबूत होतात : तीळ कॅल्शियमने भरपूर असल्याने हाडांना बळकटी मिळते.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढते : गुळातील लोहामुळे अॅनिमियाचा धोका कमी होतो.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : तिळांमुळे त्वचा चमकदार राहते आणि केस गळती कमी होण्यास मदत होते.
सांधेदुखी व स्नायू दुखणे कमी होते : हिवाळ्यातील वेदनांवर तिळगुळ उपयुक्त ठरतो.
ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो : गुळातील नैसर्गिक साखर आणि पौष्टिक घटक शरीराला ताकद देतात.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)