नववर्षात नेहमीप्रमाणे संकल्प केलाय, पण कधीच पूर्ण होत नाही? मग, वापरा 'या' टिप्स

Swapnil S

भरपूर पाणी पिणे- आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक पाणी मिळणे हे गरजेचं असते. त्यामुळे दररोज भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. कामाच्या ठिकाणी किंवा इतर कुठेही जाताना पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवा.
आहाराचे नियोजन- बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. आहारात शक्य तितके पौष्टिक पदार्थ घ्या.
दररोज व्यायाम करणे शरीरासाठी व्यायाम गरजेचा असतो. व्यायामातून शरीराची फिटनेस उत्तम राहते, शिवाय दिवसभर उत्साह देखील कायम राहतो. त्यामुळे आनंद मिळेल अशा गोष्टी करा. जिम, मॉर्निंग वॉक, डान्स किंवा योगाद्वारे तुम्ही दररोज थोड्यावेळासाठी का होईना शरीराची हालचाल करा.
लहान गोष्टींकडे लक्ष द्या तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या लहानातल्या लहान यशाबद्दल आनंद साजरा करा. अशा गोष्टींकडे लक्ष दिल्याने, तुम्हाला मोठी आव्हाने यशस्वीपणे पेलण्यास प्रेरणा मिळते.
चुकांमधून शिका तुम्ही केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका; किंवा एखादी चूक तुमच्याकडून झाली म्हणून लगेच खचून जाऊ नका. उलट त्यांचा फायदा करून घ्या. तुम्ही केलेल्या चुकांना समजून घेऊन भविष्यात पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घ्या. | PM
ध्येयाकडे लक्ष द्या आपण आपली ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत अशी प्रतिमा डोळ्यासमोर कायम ठेवा. सकारात्मक विचार, आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची सकारात्मकता देखील तितकीच महत्त्वाची. मला यश मिळणारच....हा विचार केल्यानेही प्रचंड प्रोत्साहन तर मिळतेच, शिवाय आत्मविश्वासही वाढतो.
दररोज संकल्पांकडे लक्ष द्या तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून जर तुम्ही तुमच्या ठरवलेल्या संकल्पांकडे पाहिलेत तर ते पूर्ण करण्यास फार अवघड होणार नाही.
मानसिक आरोग्य रोजचा ऑफिसचा तणाव, कुटुंबातील वाद, यासारख्या गोष्टीचा माणसाच्या मनावर ताण पडतो, त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. आपल्या मनावर येणारा ताण, कमी करण्यासाठी ध्यान-साधना करावी. तुम्हाला आनंद देणाऱ्या आणि दगदगीतून विश्रांती मिळवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या.