संधी मिळेल तेव्हा स्वतःला सिद्ध करणाऱ्या या क्रिकेटरचा आज वाढदिवस, पाहा त्याची आकडेवारी आणि प्रवास

वृत्तसंस्था

भारतीय मुख्य संघात कमी अधिक प्रमाणात संधी मिळणार संजू सॅमसनचा आज वाढदिवस आहे 

संजूच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केरळकडून खेळतो. टीम इंडियासाठी आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले आहेत

संजू सॅमसनचा जन्म 11 नोव्हेंबर 1994 रोजी लिझी विश्वनाथ आणि सॅमसन विश्वनाथ यांच्या कुटुंबात  झाला. त्याचे वडील दिल्ली पोलिस हवालदार होते.

संजूला IPS अधिकारी व्हायचे होते. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या वडिलांनी दिल्लीतील पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी सोडली.

त्याची दीर्घकाळची मैत्रीण चारुलता हिच्यासोबत शनिवार, 22 डिसेंबर 2018 रोजी विवाहबंधनात अडकला.

संजूला 2013 मध्ये आयपीएल खेळण्याची संधी मिळाली जिथे त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले.

संजूने 19 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध T20I मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. यानंतर, त्याने 23 जुलै 2021 रोजी श्रीलंकन ​​क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

12 ऑक्टोबर 2019 रोजी, त्याने केरळ आणि गोवा यांच्यातील 2019-20 विजय हजारे ट्रॉफी सामन्यादरम्यान लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याने 129 चेंडूत नाबाद 212 धावा केल्या.

वेळोवेळी स्वतःला सिद्ध करूनदेखील संजू संघामध्ये आपले स्थान पक्के करण्यात अयशस्वी ठरत आहे, त्याचे फॅन सुद्धा बऱ्याचदा संघामध्ये त्याचे सिलेक्शन न झाल्याने नाराज होताना दिसतात