केस गळतात, कोंडा त्रास देतोय? टोमॅटोचा रस ठरू शकतो रामबाण उपाय
Mayuri Gawade
केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस घरगुती उपाय म्हणून वापरला जाऊ शकतो.
टोमॅटो चिरून किंवा किसून त्याचा ताजा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावू शकता.
टोमॅटोमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास मदत करतात.
टोमॅटोचा रस स्काल्पची पीएच पातळी संतुलित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो.
टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट्समुळे स्काल्पखालील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
नियमित वापर केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते.
तेलकट आणि चिपचिपीत केसांचा त्रास कमी करण्यासाठीही टोमॅटोचा रस उपयुक्त मानला जातो.
टोमॅटोमधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांना पोषण देऊन त्यांना मजबूत बनवतात.
केसांवर नैसर्गिक चमक आणून त्यांना अधिक मऊ, सिल्की आणि निरोगी दिसण्यास मदत होऊ शकते. | All Images : AI Generated