उन्हाळ्यात 'ही' पाच फळे खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढण्याचा धोका होईल कमी; वेदनाही शमतील

Kkhushi Niramish

शरिरात प्युरीन नावाच्या पदार्थाच्या विघटनातून युरिक ॲसिड तयार होते. साधारणपणे, हे आम्ल मूत्रपिंडांद्वारे शरीराबाहेर जाते, परंतु जेव्हा त्याचे प्रमाण वाढते किंवा मूत्रपिंड ते योग्यरित्या फिल्टर करू शकत नाहीत, तेव्हा ते शरिरात जमा होऊ लागते. युरिक ॲसिड वाढल्याने सांधेदुखी, गुडघेदुखीसारखे त्रास होतात. विशेष करून हाडांचे दुखणे वाढते. | All Photo Freepik
युरिक ॲसिड वाढल्याने शरिराच्या सांध्यांमध्ये वेदना मोठ्या प्रमाणात वाढतात.
युरिक ॲसिड वाढल्यामुळे चालणे, उठणे, बसणे, पळणे यासारख्या क्रिया करताना वेदना जाणवतात.
उन्हाळ्यात युरिक अ‍ॅसिड वाढण्यास कारणीभूत ठरणारे अनेक जोखीम घटक असतात. प्युरीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने आणि थंड पेये पिल्याने हे होऊ शकते. मात्र, आपण वेळीच आहारशैलीत बदल केले तर युरिक अ‍ॅसिड वाढण्याची समस्या टाळता येऊ शकते. इथे काही फळे दिली आहेत. ज्यांचे योग्य प्रकारे सेवन केल्याने युरिक अ‍ॅसिडची समस्या वाढणार नाही.
चेरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात; ते सांध्यामध्ये यूरिक अ‍ॅसिड क्रिस्टल्स तयार होण्यापासून रोखतात. त्यामुळे आहारात चेरीचा समावेश केल्यास युरिक अ‍ॅसिडची समस्या रोखता येऊ शकते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ते युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करते.
सफरचंद केवळ युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करत नाही तर आरोग्यासाठी देखील चांगले आहे. सफरचंदात मॅलिक अ‍ॅसिड असते जे शरीरातून युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असलेले संत्रे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. हे खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करता येते.
किवी या फळातही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे आरोग्यासाठी चांगले आहे. युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही किवी खाऊ शकता. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)