Nail Art Ideas : तुमच्या नखांना नवा स्टायलिश अंदाज द्यायचा असेल तर या नेल आर्ट आयडियाज नक्की ट्राय करा!
Mayuri Gawade
हातांना नवा लूक देण्यासाठी नेल आर्ट हा आजकालचा जबरदस्त ट्रेंड ठरला आहे.
| सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
सुंदर कपडे, मेकअप यांच्यासोबतच नखांचं सौंदर्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
चला तर मग, काही हटके नेल आर्ट आयडियाज पाहूया
निऑन नेल आर्ट- संपूर्ण नखं निऑन शेडमध्ये रंगवा किंवा फक्त काही भागाला निऑन टच द्या; दोन्ही प्रकारे हा लूक जबरदस्त दिसतो.
सिल्व्हर-व्हाईट नेल आर्ट- हा शेड एथनिकपासून वेस्टर्न ड्रेसपर्यंत कुठल्याही लूकसोबत छान शोभून दिसतो. .
रेड नेल आर्ट- प्रत्येक सण-उत्सवासाठी रेड नेल आर्ट अगदी परफेक्ट आहे. विशेषतः नववधूसाठी हा डिझाईन उठून दिसतो.
शिमरी नेल आर्ट- ही डिझाईन पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही कपड्यांवर तितकीच सुंदर दिसते. शिवाय यात तुम्ही आवडीनुसार रंगांची कॉम्बिनेशन करून नवा स्टाइलही तयार करू शकता.
डॉट नेल आर्ट- सोपी पण आकर्षक डिझाईन हवी असेल तर डॉट नेल आर्ट वापरून पाहा. नखांवर बेस कोट लावा आणि त्यावर विविध रंगांचे ठिपके टाकून स्टायलिश डिझाईन तयार करा.