त्वचेच्या सुंदरतेसाठी 'हे' फेसपॅक वापरून पाहा

Swapnil S

एक चमचा संत्र्याची पावडर आणि गुलाबपाणी एकत्र करून मिश्रण तयारी करावं. हा पॅक चेहऱ्यावर अर्ध्या तासांसाठी ठेवावी. यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करावा. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येईल. | PM
एक चमचा बेसन, दोन चमचे कच्चे दूध आणि अर्धा चमचा हळद एकत्र करून फेसपॅक तयार करावा. हलक्या हातानं हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवावा. या पॅकमुळे तुम्हाला त्वचेवरील मृत पेशी काढण्यास मदत होते. बेसन आणि हळदीमुळे काळवंडलेल्या त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होते. कच्च्या दुधामुळे तुमची मऊ होते. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावावा. | PM
तेलकट त्वचेच्या समस्येतून मुक्तता हवी असल्यास मसूर डाळीचा वापर करावा. मसूर डाळीचा पॅक चेहऱ्यावर लावल्यास तेलकटपणा, डाग, मुरूम दूर होण्यास मदत मिळते. अर्धा कप मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी उठल्यानंतर भिजलेली मसूर डाळ कच्च्या दुधासह मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. मसूर डाळीची ही पेस्ट 20 मिनिटांनी चेहऱ्यावर लावावी आणि त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करावा. आठवड्यातून दोन वेळा हा फेसपॅक वापरावा. | PM
मुलतानी मातीचा फेसपॅक हा तेलकट त्वचेच्या समस्येवर रामबाण उपाय मानला जातो. चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधातून दोन चमचे मुलतानी माती मिक्स करावी. हा फेसपॅक 20 मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा पॅक चेहऱ्याला लावा. | PM
अर्धे अ‍ॅव्होकाडो आणि मध एकत्र करून फेसमास्क तयार करा. हा मास्क 10 ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करावा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा मास्क चेहऱ्यावर लावा. कोरड्या त्वचेच्या समस्येतून सुटका मिळेल. अ‍ॅव्होकाडोमध्ये ‘व्हिटॅमिन ए’, ‘व्हिटॅमिन ई’ आणि ‘व्हिटॅमिन सी’ सह भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंटचे गुणधर्ण आहेत. | PM
कोरफडीचा गर काढून घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा. अर्ध्या तासानं चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा. कोरड्या त्वचेच्या समस्येतून सुटका हवी असल्यास दुसरा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर लावा आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवा. नियमित झोपण्यापूर्वी तुम्ही कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावू शकता. आरोग्यासह त्वचेसाठी कोरफड अतिशय लाभदायक आहे | PM