गणपतीमध्ये ट्राय करा अभिनेत्री अमृता खानविलकरचे ट्रेडिशनल लुक्स
Tejashree Gaikwad
गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवादरम्यान छान दिसण्यासाठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या काही लुक्समधून आयडिया घ्या. | @amrutakhanvilkar/Instagram
अभिनेत्रीने बनारसी फॅब्रिकचा लेहेंगा आणि फुल स्लीव्ह ब्लाउज घातला आहे. ड्रॉप इअररिंग्सने लुक पूर्ण झाला आहे. हा लूक गणेशोत्सवादरम्यान कॅरी करण्यासाठी उत्तम आहे. | @amrutakhanvilkar/Instagram
तुम्ही या प्रकारचा को-ऑर्ड सेट देखील घालू शकता. अभिनेत्रीने शरारासोबत क्रॉप टॉप आणि लाँग श्रग घातला आहे. | @amrutakhanvilkar/Instagram
स्लिव्हलेस ब्लाउजची सध्या चलती आहे. त्यामुळे तुम्ही अशा लाईट रंगाची साडी नेसून त्यावर नथ, आंबाडा गजरा असा पारंपरिक लूक करु शकता. | @amrutakhanvilkar/Instagram
अमृता खानविलकरचा पिवळ्या साडीतील लूक उत्सवासाठी परफेक्ट आहे. | @amrutakhanvilkar/Instagram
ळ्या आणि लाल रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन अमृताने घातलं आहे. अशाप्रकारचा लूकही उत्तम ठरेल. | @amrutakhanvilkar/Instagram
गणेशोत्सवादरम्यान तुम्हाला आरामदायक लुक देणारे काही परिधान करायचे असेल तर अमृता खानविलकरप्रमाणे तुम्ही कॉटनची साडी नेसू शकता. | @amrutakhanvilkar/Instagram