मासिक पाळीच्या दुखण्याने त्रासलेले असाल तर ‘या’ घरगुती उपायांचा वापर करून पहा!

Swapnil S

पीरिएड्सच्या काळात या वेदना कमी करण्यासाठी महिला अनेकदा पेन किलरची मदत घेतात, ज्याचे काहीवेळा दुष्परिणाम होतात. दर महिन्याला येणार्‍या मासिक पाळीमुळे तुम्हालाही त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करा. घरगुती उपायांनी मासिक पाळीच्या वेदनांमध्ये सहजपणे आराम मिळतो आणि शरीरावर त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. | PM
हर्बल चहा प्या : लव्हेंडर आणि पेपरमिंट सारख्या हर्बल चहाचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो. | PM
जास्तीत जास्त पाणी प्या : आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज किमान एक ते दोन लिटर पाण्याची आवश्यकता आहे. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. | PM
सोपे व्यायाम करा : मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही व्यायाम खूप प्रभावी ठरतात. पेटके दूर करण्यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग किंवा स्ट्रेचिंग सारखे व्यायाम करू शकता. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंचे क्रॅम्प्स दूर होतात. व्यायामामुळे तुमच्या शरीरातून एंडोर्फिन सोडले जाते, जे मूड सुधारते आणि क्रॅम्प्स कमी करते. | PM
गरम पाण्याने शेका : जर तुम्हाला ओटीपोटात दुखणे आणि क्रॅम्प्स (क्रॅम्पड स्नायू) यांचा त्रास होत असेल, तर तुमचे पोट कोमट पाण्याने शेकावे. ओटीपोटावर गरम पाण्याची पिशवी, हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याची बाटली ठेवल्याने क्रॅम्पपासून मुक्त होण्यास मदत होते. | PM