विठ्ठलाच्या प्रिय तुळशीमध्ये लपलंय आरोग्याचं गुपित; तुम्हाला माहित आहे का?
Mayuri Gawade
विठोबा तुळशीमाळ घालतो, म्हणून आषाढी एकादशीला तुळशीचे विशेष पूजन केले जाते. | pinterest image
हीच तुळस धार्मिकतेसोबतच आरोग्यासाठीही अमूल्य मानली जाते. | pinterest image
उकळत्या दुधात तुळशीची ३-४ पाने टाकून रोज सकाळी घेतल्यास सर्दी, खोकला आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. | pinterest image
तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-वायरल आणि अँटी-ऑक्सिडंट घटक असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. | pinterest image
तणाव कमी करून मानसिक शांतता देणं, हीसुद्धा तुळशीची एक महत्त्वाची देणगी आहे. | pinterest image
तुळशीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक अॅसिड कमी होऊन किडनी स्टोनचा धोका दूर होतो. | pinterest image
आयुर्वेदात तुळशीचा उपयोग फक्त पानांपुरता मर्यादित नसून तिची फुले, बिया आणि खोडही औषधांमध्ये वापरतात. | pinterest image
आज आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल चरणी तुळशी अर्पण करताना, तिच्या या आरोग्यदायी गुणांचाही सन्मान करूया. | pinterest image