डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी तुळस आहे 'गुणकारी'

नेहा जाधव - तांबे

तुळशीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल व अँटी-फंगल घटक असतात, जे त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि मुरुमांपासून होणाऱ्या डागांपासून संरक्षण मिळते.
तुळशीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रेडिकल्सपासून वाचवतात. हे फ्री रेडिकल्सच त्वचेवर डाग-धब्बे निर्माण होण्याचं एक प्रमुख कारण असतात. अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा दुरुस्त होते आणि स्पॉट्स कमी दिसू लागतात.
तुळस ही त्वचेचा निसर्गरम्य उजळपणा वाढवते. ती त्वचेवरील पिग्मेंटेशन कमी करून स्किन टोन इव्हन करण्यास मदत करते. यामुळे डार्क स्पॉट्स हळूहळू फिकट होतात.
तुळशीमध्ये त्वचेला थंडावा देणारे आणि सूज कमी करणारे गुण आहेत. त्यामुळे चेहऱ्यावर उष्णेतेने वाढणारे मुरूम किंवा एलर्जी कमी होण्यास मदत होते.
तुळशीची ताजी पाने घेऊन त्यांची बारीक पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट चेहऱ्यावर, विशेषतः डाग आणि मुरूम असलेल्या ठिकाणी लावा. हे उपचार आठवड्यातून २ ते ३ वेळा नियमित केल्यास, त्वचेवरील डाग आणि मुरूम हळूहळू कमी होतात आणि त्वचा स्वच्छ व उजळ वाटू लागते.
तुळशीचा चहा शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत करतो. त्यामुळे रक्तशुद्धी होते आणि त्वचेला स्वाभाविक तेज प्राप्त होते.