सर्दी-खोकल्यापासून चांगल्या झोपेपर्यंत... हळदीचे दूध पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत

किशोरी घायवट-उबाळे

रोगप्रतिकारशक्ती वाढते - हळदीतील कर्क्युमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकते. | (All Photos- Yandex)
सर्दी-खोकल्यात आराम - कोमट हळदीचे दूध घशातील खवखव कमी करण्यास आणि सर्दी-खोकल्यावर आराम देण्यास मदत करू शकते.
चांगली झोप लागण्यास मदत - रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्याने शरीर रिलॅक्स होऊन झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.
सांधेदुखी कमी होण्यास मदत - हळदीतील दाहशामक गुणधर्म सांधे आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात.
पचन सुधारण्यास मदत - हळदीचे दूध पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि अपचनाचा त्रास कमी करण्यास मदत करू शकते.
त्वचेसाठी फायदेशीर - हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
शरीरातील सूज कमी करण्यास मदत - हळदीतील नैसर्गिक दाहशामक घटक शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यास सहाय्यक ठरू शकतात.
सेवन करताना ही काळजी घ्या - जास्त प्रमाणात हळदीचे दूध पिऊ नका. पित्त, औषधे किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नियमित सेवन करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)