'१५ वर्षांनंतरही एकमेकांचीच निवड...'; लग्नाच्या वाढदिवशी उमेश कामतची प्रिया बापटसाठी हृदयस्पर्शी पोस्ट
Mayuri Gawade
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी लग्नाचा १५ वा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला.
या खास निमित्ताने उमेशने प्रियासोबतचे काही सुंदर आणि आठवणींनी भरलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
“या १५ वर्षांनी आम्हाला खूप काही शिकवलं,” असं म्हणत उमेशने त्यांच्या सहजीवनाचा प्रवास शब्दांत मांडला.
“आम्ही एकत्र वाढलो, शिकलो, अडखळलो आणि मनसोक्त हसलो,” असं उमेशने पोस्टमध्ये लिहिलं.
काळाने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत एकमेकांची साथ सोडली नाही आणि नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो, अशी भावना त्याने व्यक्त केली.
उमेशने प्रियाला केवळ पत्नी नव्हे, तर आपली विश्वासू साथीदार आणि जिवलग मैत्रीणही म्हटलं आहे.
पुढेही एकमेकांचे मित्र, सहकारी, सहनिर्माते आणि प्रवासातील साथीदार राहण्याची इच्छा उमेशने व्यक्त केली.
“सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र आहोत,” असं म्हणत त्याने त्यांच्या नात्याची खास बाजू अधोरेखित केली.
“१५ वर्षे झाली, तरी आम्ही अजूनही एकमेकांचीच निवड करतोय,” या एका वाक्यात उमेशने त्यांच्या नात्याचा सार सांगितला.
उमेशच्या या प्रेमळ पोस्टवर चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव केला. | All Photos : Instagram | Umesh Kamat