जुन्या साड्यांना द्या मॉडर्न टच; पाहा एकाहून एक ट्रेंडी ड्रेस आयडिया

Mayuri Gawade

आजी-आईंच्या जुन्या साड्यांपासून तयार केलेले ड्रेस आता फॅशनमध्ये नवा ट्रेंड ठरत आहेत. पारंपरिक कापडाला मॉडर्न कट देऊन हे लूक अधिक स्टायलिश दिसतात. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
आम्ही तुमच्यासाठी काही ट्रेंडी डिझाईन्स सुचवत आहोत, जे पार्टी, सण-समारंभ आणि खास कार्यक्रमांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
जुन्या सिल्क साडीपासून तयार केलेला फुल-फ्लेअर अनारकली पॅटर्न ड्रेस.
साडीच्या काठांचा वापर करून बनवलेला जॅकेट-स्टाइल लेयर ड्रेस डिझाइन.
साडी फॅब्रिकमध्ये प्लीटेड स्कर्ट आणि शॉर्ट टॉपचा ट्रेंडी सेट.
साडीच्या एम्ब्रॉयडरी भागाचा वापर केलेला पेप्लम टॉप आणि स्कर्ट ड्रेस.
कॉटन साडीपासून तयार केलेला लॉन्ग फ्लोई ड्रेस, काठांचा सुंदर वापर.
साडीच्या बॉर्डरने हायलाइट केलेला अ‍ॅनारकली-कट ड्रेस डिझाइन.
जुन्या साडीपासून तयार केलेला हाय-लो हेमलाइन ड्रेस, मॉडर्न कटसह.
दोन रंगांच्या साड्यांचा वापर करून बनवलेला फ्यूजन लॉन्ग गाऊन ड्रेस.