साधेपणातही उठून दिसायचंय? उर्मिला कोठारेच्या या कॉटन साड्यांमधून घ्या स्टाइलिंग टिप्स

Mayuri Gawade

ऑफिसची धावपळ असो किंवा रोजच्या वापरातील सहजसोपं स्टायलिंग, आराम आणि सौंदर्याचा परफेक्ट मेळ साधायचा असेल तर उर्मिला कोठारेच्या या कॉटन साड्या नक्कीच तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात.
पिंक आणि ग्रे कॉम्बिनेशनची एलिगंट कॉटन साडी - साधेपणातही उठून दिसणारा हा लुक ऑफिस मीटिंगपासून ते छोट्या कौटुंबिक कार्यक्रमांपर्यंत सहज कॅरी करता येईल. पिंक आणि ग्रे रंगाची जोडी अत्यंत आकर्षक दिसते.
फ्लोरल प्रिंटची सौम्य गुलाबी साडी - हलके फुलके फुलांचे प्रिंट आणि सौम्य रंगसंगतीमुळे ही साडी दिवसभर परिधान करण्यासाठी उत्तम पर्याय ठरते. फ्रेश आणि फेमिनिन लुक देणारी ही साडी प्रत्येक वयोगटाला शोभून दिसेल.
जांभळ्या रंगाची क्लासिक कॉटन साडी - रॉयल जांभळा रंग आणि पांढरा बॉर्डर या साडीला वेगळीच उठावदारता देतो. ऑफिस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सणासुदीच्या दिवशी हा लुक नक्कीच लक्षवेधी ठरेल.
लाल रंगातील ग्रेसफुल एलिगन्स - साधा पण प्रभावी लुक हवा असेल तर लाल रंगाची ही साडी उत्तम निवड आहे. मिनिमल ज्वेलरीसोबत हा लुक अधिक खुलून दिसतो.
पेस्टल पिंक पोल्का डॉट साडी - आरामदायी आणि ट्रेंडी अशा दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ या साडीत दिसतो. ऑफिस, ब्रंच डेट किंवा मैत्रिणींसोबतच्या भेटीसाठी हा लुक परफेक्ट आहे.
मल्टिकलर हँडलूम पॅटर्न साडी - रंगीत विणकाम आणि पारंपरिक डिझाइनमुळे ही साडी एथनिक लुकला आधुनिक टच देते. साध्या अॅक्सेसरीजसोबत ती अधिक आकर्षक दिसते.
व्हाईट बेसवरील प्रिंटेड कॉटन साडी - उन्हाळी आणि फ्रेश व्हाइब्स देणारी ही साडी डेली वेअरसाठी उत्तम आहे. हलक्या रंगांमुळे लुक अधिक एलिगंट आणि सोज्वळ वाटतो.
पीच-पिंक शेडमधील क्लासिक लुक - साधेपणा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ या साडीत पाहायला मिळतो. ऑफिससाठी किंवा एखाद्या छोट्या समारंभासाठी ही साडी सहज परिधान करता येईल. | All Photo : Urmila Kothare |Instagram