30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता? 'हे' गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात

Swapnil S

मनगटात वेदना : फोनच्या अतिवापरामुळे मनगटात सुन्न आणि वेदना होऊ शकतात. यामुळे मनगटात मुंग्या येणे देखील होऊ शकतात, ज्यामुळे पुढे कार्पल टनेल आणि सेल्फी मनगट होऊ शकतात. | PM
कर्करोग: जे लोक मोबाईलवर जास्त वेळ बोलतात, त्यांना मेंदूच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. मोबाईल कानाजवळ ठेऊन बोलत असताना त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऊतींद्वारे शोषले जातात. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. | PM
झोपेचा त्रास : झोप हा आपल्या जीवनशैलीचा सर्वात आवश्यक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेचे तास कमी होतात. यामुळे सकाळी फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर झोप येते. मोबाईलच्या अतिवापरामुळे कधी कधी निद्रानाश होतो. | PM
एकाग्रतेचा अभाव : लोकांच्या मल्टीटास्किंग कौशल्याचे वाईट परिणाम होतात जर ते मोबाईलवर जास्त बोलतात आणि त्यांची एकाग्रता कमी होऊ लागते. जे लोक मोबाईल फोनवर जास्त वेळ बोलतात ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यांची कार्यक्षमता ढासळते. | PM
बहिरेपणा: जास्त वेळ मोबाईलवर बोलल्याने तुमची ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे तुम्ही बहिरे होऊ शकता. किंबहुना मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी कानाच्या नाजूक उतींचे नुकसान होते. म्हणूनच जास्तीत जास्त परिणाम कानाच्या आतील भागावर होतो. | PM