Vaastu Tips : 'या' वस्तू खिशात ठेवा; Pocket नेहमी पैशांनी भरलेले राहील

Kkhushi Niramish

वास्तुशास्त्र केवळ घरातील वास्तु कुठे असावी किंवा कोणती वस्तू कुठे ठेवावी एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. तर समृद्ध आयुष्य जगण्यासाठी देखील वास्तुशास्त्र अनेक गोष्टी सांगते. वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही खिशात काही वस्तू ठेवल्या तर तुमची आर्थिक भरभराट होऊन तुमचे पॉकेट पैशांनी नेहमीच भरलेले राहते. - पिंपळाचे पान पिंपळाचे पान खूप शुभ मानले जाते. तुम्ही आर्थिक संकटात असाल तर खिशात पिंपळाचे पान ठेवावे. यामुळे तुमचे आर्थिक संकट तर दूर होईलच पण आर्थिक भरभराटही होईल. | Freepik
पिवळ्या तांदळाची पुडी वास्तुशास्त्रानुसार पिवळ्या तांदळाची पुडी खिशात ठेवल्यास खिसा कायम पैशांनी भरलेला राहतो. तसेच घरात कधीही अन्नाची कमतरता राहत नाही. | Freepik
चांदीचे नाणे - चांदीचे नाणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे चांदीचे नाणे खिशात ठेवणे कायम शुभ असते. यामुळे समृद्धी प्राप्त होते. | AI Generated
वास्तुशास्त्र सांगते कमळाच्या फुलाचे मूळ खूप शुभ फळ देणारे असते. फुलाचे मूळ खिशात ठेवल्याने आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाहते. ही ऊर्जा पैशांना तुमच्याकडे आकर्षित करते. कमळाच्या फुलाची मुळे शुक्रवारी खिशात ठेवणे अत्यंत शुभ असते. | Freepik
कुबेर यंत्र हिंदू धर्मात कुबेर ही धनाची देवता मानली गेली आहे. त्यामुळे कुबेर यंत्र खिशात ठेवल्याने तुम्ही धनवान होऊ शकता. | Freepik
भाग्यकारक वस्तू ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्रानुसार तुम्हाला भाग्यकारक असलेली कोणतीही वस्तू खिशात ठेवल्यास तुमची आर्थिक भरभराट होऊन तुमच्याकडे समृद्धी येते. | Ai Generated
श्री लक्ष्मी यंत्र आर्थिक समृद्धी येण्यासाठी श्री लक्ष्मी यंत्र किंवा लक्ष्मी देवीचे चित्र खिशात ठेवणे हे देखील खूपच शुभ असते. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) | AI Generated