Vaastu Tips : नैऋत्य दिशेला 'अशी' रचना केल्यास घरात राहील शांतता

Kkhushi Niramish

दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मधील दिशा म्हणजे नैऋत्य (Southwest) दिशा होय. | Freepik
घर असो किंवा दुकान वास्तुशास्त्राच्या नियमानुसार त्याची रचना केल्यास आयुष्य जगताना त्याचे चांगले लाभ मिळतात, असे वास्तुशास्त्र मानते. | Freepik
वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेचा मूळ घटक किंवा तत्व पृथ्वी हे आहे. या दिशेवर पृथ्वीतत्वाचा प्रभाव असतो, असेही म्हणता येईल. | Freepik
त्यामुळे या दिशेत घरातील जड सामान तुम्ही ठेवू शकता. | Freepik
उदाहरणार्थ एखादे मशीन या दिशेत ठेवू शकतात. | Freepik
वास्तुशास्त्रानुसार, जर तुमचे दुकान असेल किंवा अन्य कोणता व्यवसाय असेल तर नैऋत्य दिशेत कॅश काउंटर असायला हवे. यामुळे भरभराट होते. | Freepik
नैऋत्य दिशेला दारे किंवा खिडक्या उघड्या नसाव्या. त्यामुळे शक्यतो या दिशेत खिडकी किंवा दार बनवूच नये. | Freepik
नैऋत्य दिशेला कोणताही खड्डा नसावा तसेच शौचालय किंवा कुपनिलका याठिकाणी असू नये. | Freepik
वास्तुशास्त्रानुसार, नैऋत्य दिशेतील जागा घरातील अन्य जागांच्या तुलनेत थोडी उंच असावी. | AI Generated
यामुळे घरात नेहमीच शांतता नांदते आणि कुटुंब सुखी असते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) | Freepik