नवऱ्याला इम्प्रेस करायचंय? Valentine’s Day साठी पाहा टॉप गिफ्ट आयडिया
किशोरी घायवट-उबाळे
Valentine’s Day 2026 : नवऱ्याला द्या खास गिफ्ट; प्रेम होईल दुप्पट! | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पर्सनलाइज्ड गिफ्ट : नवऱ्याच्या नावासह वॉलेट, घड्याळ, फोटो फ्रेम किंवा कस्टम मग द्या. अशा गिफ्टमधून तुमची खास भावना दिसते आणि ते कायम स्मरणात राहते.
रोमँटिक Candle Light Dinner : घरच्या घरी छोटंसं डेकोरेशन, त्याच्या आवडीचा मेन्यू आणि म्युझिक. ऑफिसच्या धावपळीनंतर हे सरप्राईज त्याचा दिवस खास बनवेल.
हाताने लिहिलेलं प्रेमपत्र : मोबाईल मेसेजपेक्षा हाताने लिहिलेलं पत्र अधिक भावनिक असतं. त्या प्रेमपत्रात त्याच्यासोबतच्या आठवणी, त्याच्या गुणांची प्रशंसा आणि Thank You लिहायला विसरू नका.
त्याच्या छंदाशी संबंधित गिफ्ट : तो फिटनेस प्रेमी असेल तर जिम अॅक्सेसरीज, म्युझिक आवडत असेल तर हेडफोन, स्पोर्ट्स फॅन असेल तर त्याच्या आवडत्या टीमचं मर्चेंडाइज. त्याच्या आवडीचं गिफ्ट दिल्यास तो नक्कीच इम्प्रेस होईल.
एकत्र वेळ घालवा : मोबाईल सायलेंटवर ठेवा आणि पूर्ण वेळ फक्त त्याच्यासाठी द्या. लाँग ड्राइव्ह, घरगुती मूव्ही नाईट किंवा निवांत गप्पा. कधी कधी तुमचा वेळच त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान भेट असते.
गिफ्ट महाग असणं गरजेचं नाही, भावना आणि प्रयत्न दिसले की Valentine's Day आपोआप खास होतो!