Valentine's Day 2026 : बायकोला खुश करायचंय? 'या' गिफ्ट आयडिया ठरतील परफेक्ट!

किशोरी घायवट-उबाळे

सोनेरी नेकलेस, डायमंड रिंग किंवा आकर्षक ब्रेसलेट : दागिने हा नेहमीच महिलांचा आवडता पर्याय असतो. छोटंसं पण अर्थपूर्ण ज्वेलरी पीस तिच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणू शकतो. | (सर्व छायाचित्रे: Pinterest)
सरप्राइज डिनर डेट : तिच्यासाठी खास कँडल लाईट डिनर प्लॅन करा. घरात सजावट करून किंवा आवडत्या रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करून तिला सरप्राइज द्या. तिच्या आवडीचे पदार्थ तुम्ही स्वतः बनवले तर आनंद दुप्पट होईल.
पर्सनलाइज्ड गिफ्ट : तुमच्या आठवणींनी सजलेली फोटो फ्रेम, कस्टमाइज्ड मग, किंवा हाताने लिहिलेलं प्रेमपत्र या छोट्या गोष्टी अनेकदा महिलांचे मन जिंकतात. भावनिक स्पर्श असलेली अशी भेट कायम लक्षात राहते.
तिच्या आवडीची गोष्ट : तिला हँडबॅग, परफ्यूम, ड्रेस किंवा स्पा व्हाउचर आवडत असेल तर तिच्या पसंतीनुसार गिफ्ट निवडा. बायकोच्या आवडी लक्षात घेऊन दिलेली भेट सर्वात खास ठरते.
वेळ आणि साथ, सर्वात मोठी भेट : महागड्या वस्तूंपेक्षा तुमचा वेळ आणि प्रेम तिच्यासाठी अधिक मौल्यवान असू शकतो. मोबाईल बाजूला ठेवून तिच्यासोबत काही तास निवांत घालवा आणि जुन्या आठवणींना उजाळा द्या.