'मल्याळम सिनेमात पदार्पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा नवा लूक चर्चेत फोटो पाहिलेत का?

Mayuri Gawade

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या वनिता खरातने मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनयासोबतच वनिता तिच्या फिटनेस प्रवासामुळेही चर्चेत आली असून, तिने तब्बल २४ किलो वजन कमी करत आपल्या नव्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
नुकतेच वनिताने इंस्टाग्रामवर पारंपरिक दाक्षिणात्य लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले असून, तिच्या या नव्या अंदाजाची चर्चा सुरू झाली आहे.
हिरवट-पिवळ्या रंगाची साडी, केसांत माळलेली पांढरी फुलं आणि कपाळावर छोटीशी टिकली यामुळे वनिताचा साधा, पारंपरिक लूक खुलून दिसत आहे.
केसांची वेणी, त्यात माळलेला पांढऱ्या आणि लाल फुलांचा गजरा आणि गळ्यातील मंगळसूत्रामुळे वनिताच्या या फोटोशूटला खास मराठमोळा साजही मिळाला आहे.
कोणताही भडक मेकअप किंवा भरजरी दागिने न घालता वनिताने या फोटोशूटमध्ये आपलं नैसर्गिक सौंदर्य आणि साधेपणा जपला आहे.
या फोटोंसोबत वनिताने 'Manifesting my Malayalam cinema debut!' असं कॅप्शन दिल्यामुळे तिच्या मल्याळम चित्रपटसृष्टीतील संभाव्य पदार्पणाची चर्चा रंगली आहे.
वनिताने मल्याळम सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी तिच्या आगामी चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. | All Photos : Instagram | Vanita Kharat