Vanrani Toy Train : पर्यटकांची आवडती ‘वनराणी’ पुन्हा सज्ज; पाहा नव्या ट्रेनची झलक

Mayuri Gawade

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली ‘वनराणी’ पुन्हा सुरू होणार आहे. | Instagram : sanjaygandhinationalpark
२०२१ मधल्या तौक्ते चक्रीवादळामुळे ही टॉय ट्रेन बंद पडली होती. | Instagram : sanjaygandhinationalpark
लवकरच ही सर्वांची लाडकी ट्रेन पुन्हा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. | Instagram : sanjaygandhinationalpark
२.३ किमी लांबीच्या ट्रॅकवर ही ट्रेन झाडांमधून वळणं घेत धावते. | Instagram : sanjaygandhinationalpark
मुलं, पालक, वयस्कर सगळ्यांनाच ही ट्रेनची सफर आवडते. | Instagram : sanjaygandhinationalpark
प्रवासात हिरवळ, पक्षी, हरिणं आणि जंगलाचं सौंदर्य जवळून पाहता येतं. | Instagram : sanjaygandhinationalpark
कान्हेरी गुंफा, नौकाविहार, सफारी यांच्यासोबत ही ट्रेनही मोठं आकर्षण आहे. | Instagram : sanjaygandhinationalpark
ऑगस्टपासून ही ट्रेन तिच्या नव्या रूपात जंगल सफरीचा आनंद देणार आहे. | Instagram : sanjaygandhinationalpark