Vat Purnima 2026 : उपवास करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं

Mayuri Gawade

यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक महिला उपवास करतात.
मात्र, उपवास करताना श्रद्धेसोबतच आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
उपवास सुरू करण्यापूर्वी सुका मेवा, दूध किंवा फळं खाऊन दिवसाची सुरुवात करा.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी किंवा शहाळ्याचं पाणी प्या.
सफरचंद, केळी आणि पपईसारख्या फळांचा आहारात समावेश करा.
साबुदाणा वडा आणि चिप्ससारखे जास्त तेलकट पदार्थ टाळा.
वरीचा भात, राजगिरा, रताळे यांसारखे हलके पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या.
कडक उन्हात बाहेर जाणे टाळा आणि पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करा.
रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफी पिणे टाळा.
गर्भवती, स्तनदा माता आणि मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करावा.
उपवास सोडताना जड जेवणाऐवजी हलकं आणि पचायला सोपं अन्न खा. | All Photos : Ai Generated