वटपौर्णिमेचा साज अधिक खास! ठुशी मंगळसूत्राचे ८ ट्रेंडी डिझाइन्स
Mayuri Gawade
वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला नव्या मंगळसूत्राच्या शोधात असतात. पारंपरिक लूकला आधुनिक स्पर्श देणारी ठुशी मंगळसूत्रे सध्या ट्रेंडमध्ये असून त्यांचे हे ८ आकर्षक प्रकार खास तुमच्यासाठी...
काळ्या मण्यांच्या अनेक पदरी माळेला मोत्यांचा आणि सोनसळी पेंडंटचा सुंदर स्पर्श देणारे हे ठुशी मंगळसूत्र पारंपरिक साडीवर विशेष खुलून दिसते.
मिनिमल आणि एलिगंट लूक आवडणाऱ्या महिलांसाठी हे डिझाइन उत्तम पर्याय आहे. साधेपणातही राजेशाही सौंदर्य खुलवणारे हे मंगळसूत्र रोजच्या वापरासाठीही योग्य ठरू शकते.
महाराष्ट्रीयन दागिन्यांची झलक दाखवणारे हे जड पेंडंट असलेले ठुशी मंगळसूत्र सण-समारंभ आणि वटपौर्णिमेच्या पारंपरिक लूकसाठी परफेक्ट आहे.
काळ्या मण्यांमध्ये सोनसळी बीड्सची नाजूक गुंफण आणि रंगीत स्टोन असलेले पेंडंट या डिझाइनला आधुनिक आणि ट्रेंडी लूक देतात.
गोल्डन बीड्स आणि आकर्षक नक्षीकाम असलेल्या या डिझाइनमुळे मंगळसूत्राला खास रॉयल टच मिळतो. पैठणी किंवा सिल्क साडीवर हा प्रकार उठून दिसतो.
मोत्यांची सजावट आणि पारंपरिक नक्षीकाम यांचा सुंदर मिलाफ असलेले हे डिझाइन वटपौर्णिमेच्या खास पूजाविधीसाठी निवडता येईल.
सडपातळ डिझाइन आणि छोटेखानी पेंडंटमुळे हे ठुशी मंगळसूत्र हलके, आकर्षक आणि प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभून दिसणारे आहे.
कुंदन आणि स्टोनवर्कची झलक असलेले हे ठुशी मंगळसूत्र पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुरेख संगम दाखवते. विशेष प्रसंगांसाठी हा प्रकार उत्तम पर्याय ठरू शकतो. | All Photos : Ai Generated