भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. दररोजच्या आहारात भाज्यांचा समावेश केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. | All Photos- Yandex
अनेकांना काही भाज्या कच्च्या खायला आवडतात. परंतु काही भाज्या कच्च्या खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अरबीमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट नावाचे घटक असते. कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली अरबी खाल्ल्यास तोंडात, घशात खाज सुटते आणि जळजळ होते.
कच्चे पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस, पोटदुखी,आणि अपचनसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून पालक नेहमी शिजवून खा.
कच्च्या बटाट्यांमध्ये सोलानिन नावाचा पदार्थ असतो, जो आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. म्हणून नेहमी बटाटा खाण्यापूर्वी चांगले शिजवा.
राजमा न शिजवता खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. कारण त्यात फायटोहेमॅग्लुटिनिन (Phytohaemagglutinin) नावाचा घटक असतो. ज्यामुळे उलट्या, पोटदुखी आणि अतिसारसारख्या समस्या उद्भवतात.
वांग्यांमध्ये सोलानिन पदार्थ असतो. म्हणून कच्चे वांगी खाल्ल्याने त्वचेवर खाज सुटणे, पोट बिघडणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच अॅलर्जी देखील होऊ शकते.
कच्चे फ्लॉवर खाल्ल्याने गॅस आणि पोटफुगी वाढू शकते. म्हणून फ्लॉवर नेहमी चांगले शिजवूनच खाल्ले पाहिजे.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)