Vijay Deverakonda Luxury House : १५ कोटींच्या आलिशान घरात राहतो विजय देवरकोंडा; पाहून थक्क व्हाल!

Mayuri Gawade

मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाने आपल्या दमदार अभिनयासोबतच स्टायलिश व्यक्तिमत्त्वामुळे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (Vijay Deverakonda)
त्याच्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणेच, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.
त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलचे खरे आकर्षण म्हणजे आलिशान घर. विजयच्या चित्रपटांप्रमाणेच, त्याच्या घराबद्दलही चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.
हैदराबादच्या जुबली हिल्स या उच्चभ्रू भागात असलेले त्याचे आलिशान घर पाहून कोणीही थक्क होईल. सुमारे १५ कोटी रुपये किंमतीचा हा बंगला विजयच्या यशाचा आणि त्याच्या लक्झरी जीवनशैलीचा पुरावा देतो.
या घराच्या पांढऱ्या भिंती, लाकडी फर्निचर आणि मोठ्या काचेच्या खिडक्या घराला एलिगंट लूक देतात.
त्याच्या टेरेसवर हिरवळीने वेढलेला आरामदायी कोपरा आहे, जिथे विजय त्याचा पाळीव कुत्रा ‘स्टॉर्म’सोबत वेळ घालवताना दिसतो.
दरम्यान, विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या साखरपुड्याच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
दोघांनीही अद्याप या चर्चेला दुजोरा दिलेला नसला तरी, सूत्रांच्या माहितीनुसार हे जोडपे फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्नबंधनात अडकू शकते.