दररोज ३० मिनिटे चालण्याने शरीरात दिसतील 'हे' बदल, वाचा फायदे
Krantee V. Kale
'चालणे' हा देखील व्यायामाचा एक भाग आहे, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. दररोज चालणे का महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया. | All Photos- Yandex
चालण्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि मेटाबॉलिजम रेट वाढतो. नियमित चालण्यामुळे वजन कमी होते तसेच मधुमेहाचा धोका कमी होतो.
चालण्यामुळे एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे मूड सुधारतो आणि ताण कमी होतो.
दररोज ३०-४५ मिनिटे चालण्याने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे विकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
दररोज चालण्याने पाय, कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. तसेच हाडं मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांचा धोका टळतो.
जेवणानंतर चालण्याने पचनक्रिया सुधारते. तसेच बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनसारख्या समस्येपासून आराम मिळतो.
चालण्यामुळे शरीर आणि मन थकते, ज्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते.
नियमित चालण्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला व विषाणूजन्य संसर्गाचा धोका कमी होतो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)