ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी सुपरफूड ठरेल अक्रोड; आताच वाचा फायदे
Mayuri Gawade
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अक्रोडसारख्या सुपरफूडचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
अक्रोडमध्ये असलेली प्रथिने आणि निरोगी चरबी शरीराला आवश्यक ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात.
त्यातील ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढते.
अक्रोडमधील पोषक घटक न्यूरॉन्सचे संरक्षण करतात आणि मानसिक ताण कमी करतात.
जास्त वेळ बसून काम केल्यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून अक्रोड शरीराचे संरक्षण करते.
अक्रोडमुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे अ, ब आणि ई असल्याने शरीर तंदुरुस्त राहते.
तसेच भूक नियंत्रणात ठेवून वजन सांभाळण्यासाठीही अक्रोड उपयुक्त ठरतो.