झटपट काही तरी गोड बनवायचंय? दुधी भोपळ्याचा शिरा ट्राय करा, जाणून घ्या रेसिपी
Kkhushi Niramish
प्रथम ताजा दुधी भोपळा सोलून कापून घ्या. | All Photo - Sajjan Food Journey (You Tube Short)
कापलेला दुधी भोपळा छान किसून घ्या.
शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी लागणारा सुकामेवा तयार ठेवा यासाठी काजू, पिस्ता, बादाम, मणुके, विलायची पावडर, आवडत असल्यास सुके किसलेले खोबरे
तुम्ही दुधी भोपळा ज्या प्रमाणात घेतला आहे त्या प्रमाणात खवा घ्या.
शिऱ्यासाठी किमान एक वाटी साखर आवश्यक आहे.
आता पहिले दुधी भोपळा छान भाजून घ्या. त्यातील पाणी जळून जाईल.
नंतर दूध घालून दुधी भोपळा पुन्हा भाजा हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करावी
आता दुधी भोपळ्यात छान खवा आणि साखर टाकून तो पुन्हा भाजा
आता निम्मा सुकामेवा घालून पुन्हा थोडे हलकेच भाजा
दुधी भोपळ्याचा छान गोड गोड शिरा तयार आहे. त्यावर सजावटीसाठी उरलेला सुकामेवा घालून सजवा आणि बाऊलमध्ये सर्व्ह करा.