काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गिरिजा ओक आकाशी कॉटन साडीत दिसली आणि तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (गिरिजा ओक)
साधी, सुटसुटीत कॉटन साडी, मोजके दागिने आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे तिच्या साड्यांचा लूक अनेकांसाठी ट्रेंड ठरला.
ऑफिसपासून कॅज्युअल मीटिंग ते छोटेखानी कार्यक्रमासाठी ‘प्रेझेंटेबल पण कम्फर्टेबल’ असा लूक कसा असावा, याची परफेक्ट आयडिया गिरिजाच्या या कॉटन साड्यांमधून मिळते.
लाल कॉटन साडी आणि मॅचिंग ब्लाऊज - ऑफिसमध्येही आत्मविश्वास दाखवणारा, पण ओव्हरड्रेस न वाटणारा क्लासिक लूक.
फिकट बेज रंगाची कॉटन साडी म्हणजे मिनिमल एलिगन्स. मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा साध्या-सुध्या किंवा कार्यक्रमांसाठी हा लूक अगदी परफेक्ट.
सोनेरी कॉटन साडी आणि साधे दागिने- दिसायला सॉफ्ट आणि ग्रेसफुल असा लूक.
हलकी पट्ट्यांची कॉटन साडी कॅज्युअल ऑफिस डे किंवा सहकाऱ्यांसोबतच्या गॅदरिंगसाठी एकदम योग्य.
ग्रे कॉटन साडी म्हणजे ‘नो-नॉन्सेन्स’ स्टाइल. प्रोफेशनल, शांत आणि स्टायलिश- तिन्ही एकत्र.
साधी साडी आणि थोडा डिझायनर टच असलेला ब्लाऊज- ऑफिस तसेच कार्यक्रमात जायचं असेल, तर हा लूक उपयोगी.
लाइट कॉटन साडी - उन्हाळ्यासाठी परफेक्ट. कॉलेज, सेमिनार किंवा डे-इव्हेंटसाठी सुंदर पर्याय.
क्लासिक ब्लॅक कॉटन साडी, साधा पण एलिगंट प्रिंटेड ब्लाऊजसह; दिवसभर आरामदायक, प्रोफेशनल आणि स्टायलिश लूक देणारी. ऑफिस किंवा मित्र-मैत्रिणींच्या भेटीसाठी एकदम योग्य.