डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको! 'ही' लक्षणे असू शकतात गंभीर आजारांचे संकेत

किशोरी घायवट-उबाळे

धूसर दिसणे - सतत धूसर किंवा बदलणारी दृष्टी ही मोतीबिंदू, मधुमेह किंवा रेटिनाशी संबंधित समस्येचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
डोळे दुखणे - डोळ्यांवर ताण आणि वारंवार डोकेदुखी ही दृष्टीदोष, ड्राय आय किंवा डोळ्यांच्या संसर्गाची चिन्हे असू शकतात.
लालसरपणा - डोळे सतत लाल होणे किंवा पाणी येणे हे केवळ ॲलर्जी नाही, तर दाह किंवा ड्राय आय सिंड्रोमचेही लक्षण असू शकते.
रात्री कमी दिसणे - रात्री स्पष्ट न दिसणे किंवा प्रकाशाचा त्रास होणे हे मोतीबिंदू किंवा रेटिनामधील बदलांचे संकेत असू शकतात.
फ्लोटर्स आणि फ्लॅशेस - डोळ्यासमोर ठिपके, चमक किंवा सावल्या दिसणे हे रेटिना डिटॅचमेंटसारख्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
डोळ्यांची तपासणी - नियमित नेत्रतपासणी केल्यास ग्लॉकोमा, डायबिटिक रेटिनोपॅथी आणि उच्च रक्तदाबामुळे होणारे डोळ्यांचे आजार लवकर ओळखता येतात.
उपचारात विलंब नको - ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका, कारण वेळेवर उपचार केल्यास दृष्टी सुरक्षित राहू शकते.
डोळ्यांची काळजी घ्या - डोळ्यांची नियमित तपासणी आणि योग्य वेळी उपचार केल्यास कायमस्वरूपी दृष्टीदोषाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)