वाढत्या पाणीटंचाईत आजपासूनच करा 'या' गोष्टी; होईल पाण्याची बचत
किशोरी घायवट-उबाळे
नळ सुरू ठेवू नका - दात घासताना किंवा भांडी धुताना नळ बंद ठेवल्यास मोठ्या प्रमाणात पाणी वाचू शकतं. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
शक्य असेल तिथे साठवून ठेवलेल्या पाण्याचा वापर करा.
गळती तात्काळ दुरुस्त करा - नळ किंवा पाइपमधील छोटी गळतीही दररोज अनेक लिटर पाणी वाया घालवते.
वाहन धुण्यासाठी पाइपऐवजी बादली वापरा - यामुळे अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
उरलेलं पाणी पुन्हा वापरा - भाज्या धुतलेलं किंवा RO मधून निघालेलं पाणी झाडांसाठी वापरता येऊ शकतं.
सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी दिल्यास बाष्पीभवन कमी होतं आणि पाणी वाचतं.
सध्याच्या पाणीटंचाईचा विचार करता या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर पाण्याची थोड्या प्रमाणात का होईना पण बचत होऊ शकेल.