वजन कमी करायचंय? तर 'हे' बदल नक्की करा

किशोरी घायवट-उबाळे

सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा : सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. | (सर्व छायाचित्रे : Yandex)
दररोज चालण्याची सवय लावा: दररोज किमान ३० मिनिटे चालल्यास कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.
आहारात फळे आणि भाज्या वाढवा : फायबरयुक्त फळे आणि भाज्या पोट भरलेले ठेवतात, त्यामुळे जास्त खाणे टळते.
जास्त तेलकट आणि बाहेरचे पदार्थ टाळा : फास्ट फूड, तळलेले पदार्थ वजन वाढवतात. म्हणून घरचे हलके आणि कमी तेल वापरलेले जेवण करा.
दिवसभर भरपूर पाणी प्या : पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि भूक नियंत्रणात राहते.
पुरेशी झोप घ्या: दररोज ७–८ तास झोप घेतल्यास हार्मोन्स संतुलित राहतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)