चहा पिण्यापूर्वी की नंतर, कधी पाणी प्यावं? आरोग्यासाठी काय योग्य?

Mayuri Gawade

चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असून दिवसाची सुरुवातच चहाने होते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
चहा पिण्यापूर्वी आणि पिल्यानंतर पाणी प्यायचं का, हा प्रश्न अनेकांना पडतो.
दंतवैद्य डॉ. उपासना गोसालिया सांगतात की चहा किंवा कॉफीच्या आधी किंवा नंतर पाणी प्यायला हरकत नाही.
मात्र तज्ज्ञांच्या मते चहा पिल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
चहातील कॅफिनमुळे शरीर डिहायड्रेट होते, त्यामुळे नंतर पाणी प्यायल्याने द्रवपदार्थांचे संतुलन पुन्हा सामान्य होते.
चहा–कॉफीमुळे दातांवर पिवळा थर तयार होतो, परंतु पाणी प्यायल्याने हा थर काही प्रमाणात कमी होतो.
चहातील साखर दातांना चिकटते आणि बॅक्टेरिया वाढू शकतात, पण चहा नंतर पाणी प्यायल्याने ही समस्या टळू शकते.
रिकाम्या पोटी चहा घेतल्याने अॅसिडिटी होऊ शकते, अशावेळी पाणी आराम देतं.
चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, पण हे काही अनिवार्य नाही.
त्यामुळे चहा आवडणाऱ्यांनी प्रत्येक वेळेनंतर एक ग्लास पाणी पिण्याची सवय ठेवली तर आरोग्याला नक्कीच फायदा होतो.