कोण आहे रान्या राव? सोन्याची तस्करी करताना दाक्षिणात्य अभिनेत्रीला झाली अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Krantee V. Kale

रान्या राव ही कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिला सोन्याच्या तस्करी प्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सोमवारी रात्री अटक केली. तिच्याकडून १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. | (फोटो सौ : https://www.facebook.com/ActressRanyaOfficial)
सोमवारी रात्री तिला अटक करून इकोनॉमिक ऑफेन्स कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. | (फोटो सौ : https://www.facebook.com/ActressRanyaOfficial)
रान्या राव गेल्या १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास करून आली होती. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तिच्यावर संशय बळावला. यानंतर, सोमवारी रात्री तिला प्रथम तपासणीसाठी आणि नंतर चौकशीसाठी रोखण्यात आले. तपासादरम्यान, तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले. | (फोटो सौ : https://www.facebook.com/ActressRanyaOfficial)
अभिनेत्री रान्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. राव हे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. | (फोटो सौ : https://www.facebook.com/ActressRanyaOfficial)
रान्याने २०१४ मध्ये 'माणिक्य' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यात ती कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपसोबत झळकली होती. मात्र, पहिल्या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यात ती अपयशी ठरली. | (फोटो सौ : https://www.facebook.com/ActressRanyaOfficial)
त्यानंतर २०१६ साली तिने विक्रम प्रभुसोबत ‘वाघा’ चित्रपटामधून तमिळ सिनेमामध्ये पदार्पण केले. तसेच, २०१७ साली अभिनेता गणेशसोबत एका पत्रकाराची भूमिका साकारत ‘पटकी’ या चित्रपटाद्वारे कन्नड सिनेमात पुनरागमन केले. मात्र, प्रेक्षकांच्या मनावर पाहिजे तशी छाप तिला पाडता आली नाही. | (फोटो सौ : https://www.facebook.com/ActressRanyaOfficial)
कर्नाटकच्या चिकमंगळुरूची मूळ रहिवासी रान्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले आहे. | (फोटो सौ : https://www.facebook.com/ActressRanyaOfficial)
अटक केल्यानंतर रान्या रावला बेंगळुरूच्या HBR लेआउटमधील DRI मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. अधिकाऱ्यांकडून ती एकटी तस्करी करीत होती की की दुबई आणि भारतामधील मोठ्या तस्करी नेटवर्कचा भाग आहे, याची सखोल तपासणी सुरू आहे. | (फोटो सौ : @RanyaRao)