मकर संक्रांतीला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी का खातात? कसे होतात फायदे जाणून घ्या

Swapnil S

भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर, वांगे, घेवडा, तीळ आणि हरभरा या भाज्यांचा समावेश होतो आणि शेंगदाणेही घातले जातात. वांगं हे वातूळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते. | PM
या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील. शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते. तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्बेत अधिक चांगली राखण्यास मदत मिळते | PM
बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते. शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे. यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पिठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते. | PM
दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उब मिळून थंडी वाजत नाही. | PM