चेकवर रकमेपुढे ‘Only’ का लिहितात? बँकेचा नियम नेमका काय सांगतो, जाणून घ्या
Mayuri Gawade
चेक भरताना रक्कम शब्दांत लिहिल्यानंतर शेवटी ‘Only’ म्हणजेच 'मात्र' असं लिहिण्याची पद्धत अनेकांना असते, कारण त्यामागे चेकच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा उद्देश असतो.
रक्कम शब्दांत लिहिल्यानंतर जास्त रिकामी जागा राहिल्यास त्यात अतिरिक्त शब्द किंवा रक्कम जोडून चेकमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
उदाहरणार्थ, 'पाच हजार' म्हणजेच ‘Five Thousand’ असे लिहून पुढे जागा सोडल्यास त्यात आणखी शब्द जोडता येऊ शकतात, त्यामुळे रक्कम बदलण्याचा धोका निर्माण होतो.
'पाच हजार मात्र' किंवा ‘Five Thousand Only’ असे लिहिल्यास रक्कम तिथेच पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते आणि उरलेल्या जागेचा गैरवापर करणे तुलनेने कठीण होते.
चेकवर ‘Only’ लिहिणे ही मुख्यतः सुरक्षेची खबरदारी आहे आणि हा शब्द लिहिणे बंधनकारक असल्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा स्वतंत्र नियम नाही.
मात्र, चेक भरताना रक्कम शब्दांत लिहिल्यानंतर शेवटी ‘Only’ लिहिण्याचा सल्ला अनेकदा सुरक्षिततेच्या दृष्टीने दिला जातो.
चेकवरील रक्कम अंकांत आणि शब्दांत एकसारखी आहे की नाही, हे चेक देण्यापूर्वी आवर्जून तपासा.
लाभार्थ्याचे नाव, तारीख आणि रक्कम लिहिताना काळजी घ्या आणि चेकवर अनावश्यक रिकामी जागा ठेवणे टाळा.
चेकमध्ये खाडाखोड किंवा ओव्हररायटिंग न करता तो काळजीपूर्वक भरल्यास आर्थिक फसवणुकीचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. | All Photos : AI Generated