विसरलेला Wi-Fi पासवर्ड पुन्हा मिळवा; फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये!
Mayuri Gawade
आजच्या डिजिटल युगात वायफाय आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
पण कधी कधी आपण स्वतःचाच Wi-Fi पासवर्ड विसरतो किंवा तो बदलायची वेळ येते आणि मग सुरु होतो गोंधळ!
अशावेळी या काही सोप्या स्टेप्स लक्षात ठेवा.
सर्वप्रथम तुमचा राउटर तपासा. त्याच्या मागील बाजूवर लिहिलेले डीफॉल्ट SSID व पासवर्ड सध्याचा पासकोड असू शकतो.
जर तुम्ही कधीच पासवर्ड बदललाच नसेल तर तो डीफॉल्ट पासवर्ड वापरून Wi-Fi कनेक्ट होईल.
राउटरचा वेब-इंटरफेस उघडण्यासाठी तुमच्या ब्राऊझरमध्ये उदाहरणार्थ १९२.१६८.१.१, १९२.१६८.०.१ किंवा १९२.१६८.१.२५४ हा आयपी टाका.
लॉगिनसाठी बहुतेक वेळा वापरकर्ता नाव व पासवर्ड म्हणून admin/admin असते, ते वापरून प्रवेश करा.
नंतर Wireless → Security (WPA2/WPA3) किंवा Wi-Fi Settings मध्ये जाऊन नवीन सुरक्षित पासवर्ड सेट करा व सेव्ह करा.
तुम्ही एक मजबूत पासवर्ड निवडा आणि सर्व जुने डिव्हाइस्स पुन्हा कनेक्ट करा.
जर तुम्ही वेब-इंटरफेसमध्ये लॉगिन करू शकत नसाल तर राउटरवरचे लहान “Reset” बटण पिनने धरून १०-१५ सेकंद दाबा, त्यामुळे फॅक्टरी रीसेट होईल.
रीसेट नंतर राउटरच्या मागील बाजूवर दिलेला डीफॉल्ट SSID/पासवर्ड वापरून कनेक्ट करा आणि लगेच नवीन पासवर्ड सेट करा.