हिवाळ्यातील खोकल्यावर रामबाण उपाय; लगेच मिळेल आराम
किशोरी घायवट-उबाळे
कोमट पाणी प्या : थंडीत घसा कोरडा पडतो. दिवसातून वारंवार कोमट पाणी प्यायल्याने घशातील खवखव आणि खोकला कमी होतो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
मध आणि आले : मधात थोडासा आल्याचा रस मिसळून घेतल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय उपयुक्त ठरतो.
वाफ घ्या :गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील जळजळ, सर्दी आणि खोकला कमी होतो. दिवसातून एक-दोन वेळा वाफ घ्यावी.
थंड पदार्थ टाळा : हिवाळ्यात आईस्क्रीम, थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स टाळावीत. यामुळे खोकला वाढू शकतो.
लवंग व तुळस फायदेशीर : लवंग चघळणे किंवा तुळशीचा काढा पिणे घशासाठी आरामदायक ठरते आणि खोकल्यावर गुणकारी आहे.
खोकला ७ ते १० दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास किंवा छातीत दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)